राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण खालील प्रकारच्या निवडणूका पार पाडते.
- रासनिप्रा सहकारी संस्थांचा व कृषीउत्पन्न बाजार समित्यांमधील / समिती संस्थांच्या सर्व साधारण निवडणूका पार पाडते. संचालक मंडळाचा कालावधी संस्थेच्या निवडणुकीच्या तारखेपासून पुढील ५ वर्षापर्यंत असेल .
- सहकारी संस्थांतील व कृषीउत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळातील रिक्त पदे निवडणुकीद्वारे भरणे.
- सहकारी संस्था/ कृषि उत्पन्न बाजार समिती यांमधील संचालक मंडळामधून पदाधिकारी निवड करणे.
- मतदार यादी तयार करणे.
- व्यक्ती सभासद असलेल्या सहकारी संस्थांची तात्पुरती मतदार यादी.
- संस्था किंवा संस्था आणि व्यक्ती सभासद असलेल्या सहकारी संस्थांची तात्पुरती मतदार यादी.
- कृषि उत्पन्न बाजार समिती संदर्भात ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक यांची तात्पुरती यादी
निवडणूकीस पात्र असणाऱ्या संस्थेने संचालक मंडळाची मुदत संपण्यापुर्वीच्या 120 दिवस आगोदर मतदार यादी नमुना ई – 3 मध्ये तयार करावी आणि सादर करावी.
- मतदारांची तात्पुरत्या यादी प्रसिद्ध करणे आणि दावे व आक्षेप मागविणे.
- सर्व आक्षेप निकाली काढल्यानंतर मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे.
- निवडणूक घेणेकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि आवश्यक असल्यास इतर अशा अधिका-यांची नियुक्ती करणे.
- निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणे.
- उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्विकारणे आणि प्रसिद्ध करणे.
- नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे.
- छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रे प्रसिद्धी करणे.
- नामनिर्देशन पत्र माघारी.
- माघारीनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि निवडणूकीसाठी चिन्ह वाटप करणे.
- उमेदवारांकडुन निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांची नियुक्ती.
- मतदान घेणे.
- मतपत्रिकांची मोजणी करणे.
- मतदान निकाल जाहीर करणे.
- निवडून आलेल्या उमेदवारांची अधिसुचना जारी करणे.
- संस्थेतील निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये पदाधिकारी निवडणूक घेणे.